(७) प्रामुख्याने वसतिगृहातील खोल्या नीटनेटक्या आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी छात्राची राहील, वसतिगृहाच्या प्रमुखांची परवानगीशिवाय खोल्या आणि खोल्यातील मांडणी छात्रांनी बदलू नये.
(८) छात्राच्या मित्र-मंडळींना, नातेवाईकांस छात्राच्या खोलीवर वसतिगृहात जाता येणार नाही.
(९) छात्राने आपली वर्तणुक वसतिगृहात व वसतिगृहाबाहेर सौजन्यशील ठेवावी, चळवळ, संप, अन्य सत्याग्रह अथवा तत्सम प्रकारांमध्ये छात्रांना सहभागी होता येणार नाही. तसेच वसतिगृह प्रतिष्ठेला बाधक होईल असे कोणतेही वर्तन करु नये.
(१०) वसतिगृह व्यवस्थेत काही अडचण असल्यास, वसतिगृह प्रमुखांच्या मदतीनेच ती सोडवली पाहिजे, गंभीर स्वरुपाचा अन्याय होत आहे, असे वाटले तर वसतिगृह प्रमुखाच्या पूर्वसंमतीने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागता येईल.
(११) स्थानिक परिस्थितीनुसार वसतिगृह प्रमुख वेळोवेळी जे नियम करतील, ते छात्रांना बंधनकारक राहतील.
(१२) छात्रांच्या प्रकृतीस बिघाड झाल्यास याचा वृत्तांत वसतिगृह प्रमुखांना ताबडतोब छात्रांनी कळविला पाहिजे आणि औषधोवचार योजना वसतिगृह प्रमुखांनी सांगितलेल्या किंवा अंशकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रथम व्हावयास पाहिजे.
(१३) शिधा नियंत्रण पद्धती ज्याठिकाणी अस्तित्वात आहे अशा ठिकाणी वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी पूर्वीच्या रेशन कार्डत नाव कमी केल्याबाबतचा दाखला आवश्यक आहे.
पालकांची स्वाक्षरी विद्यार्थ्यांची स्वाक्षरी