• Shrddha Enterprises Pro Consultany

    Financial services provider
  • Vendors Name :- kishor Bhosale

    *नियमव अटी *      * Agreement *
  • Format: (000) 000-0000.
  • 1) लोन ची फाईल देताना पुर्ण कागद पत्राची झेरॉक्स काढून सही करून द्यावी.

    2) आपण ज्या वाहनांवर लोन घेणार आहे.ते वाहन आपण खरेदी करत असाल तर स्वतःची जबाबदारी वर व्यवहार करा.यात फायनान्स कंपनी किंवा  जो  व्यक्ती  आपली फाईल करीत आहे. ते कोणतेही आपले नुकसान झाल्यास जबाबदार राहणार  नाहीत. याची आपण नोंद घ्यावी.

    3) वाहन जर खरेदी करत असल्यास तर  आपण तो व्यवहार पुर्ण करूनच लोन साठी फाईल द्यावी.

    4) पहले लोन घेतलेले असल्यास सर्व  माहिती द्यावी

    5) व्याज दर,  हप्ता, लोन ची परतफेड, प्रोसिस फी,याची सर्व माहिती,तुमच्या घरी  फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी आल्यावर त्याच्या कडुन सर्व लोन ची वरील प्रमाणे माहिती घ्यावी.

    6)  लोन मंजूर करण्यासाठी किमान 15 दिवस लागतात 
    याची नोंद  घ्यावी.

    7) 15 दिवसात जर आपली फाईल मंजूर होत नसेल तर आपण दुसरा पर्याय शोधावा, आमची वाट पाहु नये.

    8) आम्ही फायनान्स कंपनीच्या  सर्व्हीस एजंट म्हणून आपली फाईल लोन  प्रोसेस साठी घेत आहोत.

    9) आम्ही कोणत्याही प्रकारे रोख रक्कम मागत नाही. जर मागितली असल्यास  ते आपण देऊ नये. परत लोन झाल्यावर आरोप केल्यास ते मान्य केले जाणार नाही व आपल्या वरती कायदेशीर बदनामी चा खटला चालविला जाईल याची आपण नोंद घ्यावी.

    10) लोन ची फाईल आम्हाला देत असल्यास तुमच्या वाहनांचा इन्शुरन्स, व्हेलुशन.फक्त आम्ही करून देतो. यासाठी लागणारी रक्कम रोख स्वरूपात किंवा बॅंक मध्ये ही जमा करू शकता याची नोंद घ्यावी.

    11) इन्शुरन्स आम्ही ओरिजिनल कंपनीचे करीत असतो, त्यामुळे तुमच्या ओळखीचे एजंट कोणी असेल आणि तो तुम्हांस कमी रक्कम मध्ये इन्शुरन्स करून देत असतील तर ते आपणांस चुकीचा इन्शुरन्स करून देत असतात. आम्ही चुकिचे इन्शुरन्स करीत नाही. आपण आम्हाला असल्या चुकीच्या माहिती आम्हांस देऊ नये. याची ही नोंद घ्यावी.

    12) एक वेळेस जर आमच्याकडून आपण इन्शुरन्स केला तर तो परत कॅन्सल होत नाही याची नोंद घ्यावी.

    13) फाईल देतांना आपण दहा ठिकणी चौकशी करून च द्यावी,  परत व्याज दर, प्रोसिस फी, हप्ता व चेक बाऊन्स चार्जेस, NOC , फायनान्स कंपनीचे काही नियम , याची आम्ही कोणते ही जबाबदारी सर्व्हीस एजंट म्हणून घेणार नाही याची आपण काळजीपूर्वक नोंद घ्यावी.

    14) तुमच्या वाहनांवर RTO कडुन बोजा नोंद झाली व फायनान्स कंपनीकडून पेमेंट वेळेवर न मिळल्यास व काही कारणास्तव फाईल रिजेक्ट झाल्यावर सर्व्हीस एजंट म्हणून आम्ही.तुमची जबाबदारी घेत नाही, कारण ते सर्व फायनान्स कंपनीची जबाबदारी असते. ते तुम्ही फायनान्स कंपनीच्या ऑफिस ला जाऊन रितसर चौकशी करून च निर्णय तुम्हीच घ्यावा, यात आम्ही कोणतेही जबाबदार घेणार नाही.आणि त्या संदर्भात भविष्यात आम्हांस विचारणां करू नये.

    15 ) आपली लोन ची फाईल मंजूर झाल्यावर फायनान्स कंपनीचे ऑफिस चा पत्ता व संपर्क नंबर आपणांस देण्यात येईल.

    16 ) आपण लोन साठी दिलेली झेरॉक्स कागदपत्रे फायनान्स व बॅंक कडून परत मिळणार नाहीत याची आपण नोंद घ्यावी. 

    17)आपली लोन प्रोसिस करतांना फायनान्स चा प्रतिनिधी घरी आल्यावर त्यांचे पूर्ण नाव त्यांचा मोबाईल नंबर आपण लिहून ठेवावा...परत आम्हांस लोन विषयी माहिती विचारू नका... कारण ते त्या फायनान्स कंपनी मध्ये काम करतात त्यामुळेच ते आपल्याला योग्य माहिती देतील याची नोंद घ्यावी.

    18) उद्या यदाकदाचित काही ही ...लोन विषयी व कागदपत्रा विषयी नुकसान झालेले प्रथम  दर्शनी  झालेले दिसल्यावर आपण तात्काळ फायनान्स ऑफिस मध्ये जावुन चौकशी करावी. यात आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही याची आपण लक्षपूर्वक नोंद करून घ्यावी.

    19) आम्ही आपणांस इशारा देत आहोत आम्ही कोणत्याही प्रकाराचा OTP मागत नाही व मागितल्यावर आपण देऊ नये... जर आपणांस आमचे नाव सांगून कोणी OTP मागत असेल तरी ही आपण देऊ नये  याची  आपण गंभीर नोंद घ्यावी...परत तक्रार चालणार नाही.....विशेष सूचना :- आपल्या वाहनांवर RTO कडून बोजा नोंद केल्यानंतर जर पेमेंट ला विलंब होत असेल तर सदर आपण बँक किंवा फायनान्स ऑफिस ला भेटून प्रॉब्लेम विचारावा परत आम्हांस फोन करू नका.

    20) तसेच जर आपणाकडून फाईल हँडलिंग चार्जेस घेतले असतील तर ते परत मिळणार नाहीत , फाईल रिजेक्ट झाल्यावर किंवा तुम्ही स्वतःहुन कॅन्सल केल्यावर याची आपण नोंद घ्यावी. 

    *विशेष सुचना :- ज्यांनी पोकलेन मशीन लोन साठी फाईल दिली आहे अशा कस्टमर ने आपल्या जबाबदारीवर मशीन चे ओरिजिनल कागदपत्रे बॅंक किंवा फायनान्स ला द्यावेत, जर भविष्यात बॅंक चे किंवा फायनान्स कंपनीचे फेरतपासणी झाली आणि मशीन व त्या मशीन चे कागदपत्रे खोटी निघाल्यास आपल्या वरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, व लगेच बॅंक किंवा फायनान्स चे जे काही लोन रक्कम घेतली आहे ती सर्व चार्जेस सहित व व्याजासह आपणांस त्वरित भरावी लागेल व पुढे होणाऱ्या कारवाई ला सामोरे जावे लागेल याची आपण गंभीर नोंद घ्यावी परत कोणतेही तक्रार चालणार नाही.याची परत एकदा गंभीर नोंद घ्यावी.

    * वाहनांसाठी जो व्यक्ती फाईल देत आहेत त्यानी सर्व नियम काळजीपूर्वक वाचून झाल्यावर च सही करावी...

  • Clear
  • Should be Empty: