सफर सखी टूर्स प्रस्तुत
नवरात्री विशेष कोल्हापूर-आदमापूर दर्शन (१२ ऑक्टोबर २०२६)
-6abe68c69edfc0.55222430.jpeg)
Booking करण्यापूर्वी कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा!
तुमचा प्रवास सुरक्षित, आनंददायी आणि व्यवस्थित व्हावा यासाठी कृपया हा संपूर्ण Booking Itinerary शांतपणे वाचा.
या मध्ये Trip Details, Trip Cost, Itinerary, Inclusions, Exclusions, Booking Process, Things to Carry आणि Terms & Conditions यांची संपूर्ण माहिती दिली आहे.
Trip Cost, Booking Process आणि Payment संबंधित संपूर्ण माहिती पुढील विभागात दिली आहे.
(कोणतीही शंका असल्यास कृपया WhatsApp / Call वर संपर्क साधा)
------------------------------------------------------------------------
निसर्गाच्या कुशीत आणि धबधब्यांच्या नंदनवनात एक अविस्मरणीय दिवस!
पिक-अप पॉईंट्स आणि वेळा (पुणे)
- रात्री १२:०० वा: सफर सखी टूर्स ऑफिस
- रात्री १२:३० वा: हडपसर
कृपया दिलेल्या Reporting Time च्या किमान 15 मिनिटे आधी Pickup Point वर उपस्थित राहावे.
------------------------------------------------------------------------
सर्वसमावेशक पॅकेज खर्च (प्रति व्यक्ती)
नवरात्री विशेष पॅकेज: ₹१,७५०/-
(सीट कन्फर्म करण्यासाठी फक्त ₹५००/- Non-Refundable ऍडव्हान्स, उर्वरित रक्कम प्रवासाच्या एक दिवस अगोदर जमा करावी.)
(टीप: ५ वर्षांवरील मुलांसाठी पूर्ण तिकीट)
Inclusions आणि Exclusions
तुमच्या Package मध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत.(Inclusions)
- प्रवास: संपूर्ण प्रवास आरामदायी Tourist Bus किंवा Traveller (Group Size नुसार).
- जेवण
- सकाळचा नाश्ता आणि चहा
- दुपारचे जेवण (उपवास किंवा साधे जेवण)
- इतर सुविधा: Driver Allowance, Toll Tax, Parking Charges
तुमच्या Package मध्ये खालील बाबी समाविष्ट नाहीत.(Exclusions)
- रात्रीचे जेवण
- VIP दर्शन पासेस (असल्यास)
- वैयक्तिक खर्च
- Snacks, Soft Drinks किंवा अतिरिक्त खाद्यपदार्थ
- Travel Insurance
- Medical Expenses
- Itinerary मध्ये नमूद नसलेल्या कोणत्याही अतिरिक्त सेवा
------------------------------------------------------------------------
संपूर्ण वेळापत्रक Itinerary :
प्रवास मार्ग (Route)
पुणे → कोल्हापूर → आदमापूर → पुणे.
- १२:०० AM: हडपसरवरून कोल्हापूरकडे प्रस्थान (रात्रभर प्रवास).
- ०५:०० AM: कोल्हापूरला आगमन. (नवरात्रीत जेवढे लवकर पोहोचाल तेवढा दर्शनाचा नंबर लवकर लागेल, त्यामुळे मंदिर परिसरात लगेच फ्रेश होणे).
- ०५:३० AM - ०९:३० AM: साडेतीन शक्तिपीठांपैकी एक श्री अंबाबाई (महालक्ष्मी) दर्शन. (नवरात्रीची गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी मुद्दाम जास्त वेळ ठेवला आहे).
- ०९:३० AM - १०:३० AM: कोल्हापूरमध्ये गरमागरम नाश्ता.
- १०:३० AM - १२:०० PM: कोल्हापूरहून आदमापूरकडे प्रयाण (अंतर: ४५ किमी).
- १२:०० PM - ०२:०० PM: आदमापूरला आगमन आणि संत बाळूमामांचे दर्शन.
- ०२:०० PM - ०३:०० PM: दुपारचे जेवण (उपवास / साधे जेवण).
- ०३:३० PM: आदमापूरहून पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू. (वाटेत चहासाठी थांबा).
- रात्री ०९:३० PM - १०:०० PM: मंगलमय दर्शन आणि सुंदर आठवणींसोबत पुण्यात सुरक्षित आगमन.
!! महत्त्वाची सूचना !!
वाहतूक, नवरात्रीची गर्दी, हवामान, स्थानिक प्रशासनाचे नियम किंवा इतर अनपेक्षित परिस्थितीनुसार दर्शन वेळ किंवा Itinerary मध्ये आवश्यक बदल होऊ शकतात. नवरात्रीत गर्दी असल्यामुळे सर्व प्रवाशांनी वेळेचे पालन करणे बंधनकारक आहे.
अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि प्रवासाच्या सुरळीत नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
------------------------------------------------------------------------
Trip ला येताना काय सोबत आणाल?
प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी कृपया खालील वस्तू सोबत ठेवा.
- आधार कार्ड किंवा Government Photo ID (Original)
- आरामदायी आणि पारंपरिक कपडे (दर्शनासाठी)
- चालण्यासाठी Comfortable Shoes / Sandals
- वैयक्तिक औषधे
- मोबाईल Charger
- Power Bank
- आवश्यक असल्यास Dry Snacks
------------------------------------------------------------------------
Cancellation & Refund Policy
Booking करण्यापूर्वी कृपया खालील Cancellation Policy काळजीपूर्वक वाचा.
₹500 Booking Amount कोणत्याही परिस्थितीत Non-Refundable आहे.
ही रक्कम Vehicle Reservation, Tour Planning आणि इतर प्राथमिक व्यवस्थापनासाठी तत्काळ वापरली जाते. त्यामुळे Booking झाल्यानंतर ही रक्कम परत मिळणार नाही.
-6abe69a1755ea7.26505096.jpeg)
------------------------------------------------------------------------
Terms & Conditions
- Pickup & Reporting: कृपया दिलेल्या Reporting Time च्या किमान 15 मिनिटे आधी Pickup Point वर उपस्थित राहा. Bus कोणत्याही Pickup Point वर जास्त वेळ थांबू शकणार नाही.
- Itinerary: हवामान, वाहतूक, गर्दी, स्थानिक प्रशासनाचे नियम किंवा इतर अनपेक्षित परिस्थितीनुसार कार्यक्रमात बदल होऊ शकतो. अशा बदलांमुळे कोणताही Refund किंवा Compensation लागू होणार नाही.
- Meals: Package मध्ये नमूद केलेले Meals च उपलब्ध असतील. वैयक्तिक Diet Plan किंवा विशेष Food Arrangement उपलब्ध करून दिले जाणार नाही.
- वैयक्तिक जबाबदारी: मोबाईल, रोख रक्कम, दागिने, बॅग किंवा इतर मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील. हरवलेल्या, चोरी झालेल्या किंवा नुकसान झालेल्या वस्तूंसाठी Safar Sakhi Tours जबाबदार राहणार नाही. Travel insurance included नाही. ही group trip असल्यामुळे common timetable follow करणं बंधनकारक आहे.
- Health: Booking करताना प्रवाशाने स्वतःच्या आरोग्याविषयीची माहिती अचूक द्यावी. आवश्यक औषधे स्वतःसोबत ठेवावीत. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती प्राथमिक मदत उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू; मात्र डॉक्टर, हॉस्पिटल, औषधे किंवा इतर वैद्यकीय खर्चाची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील.
- Behaviour Policy: Safar Sakhi Tours प्रत्येक प्रवाशासाठी सुरक्षित, आनंददायी आणि सन्मानपूर्वक वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणून सर्व प्रवाशांनी एकमेकांशी आदराने, नम्रतेने आणि सहकार्याने वागणे अपेक्षित आहे.
मद्यपान, धूम्रपान, गैरवर्तन, वादविवाद किंवा इतर प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन स्वीकारले जाणार नाही. अशा परिस्थितीत आयोजकांना संबंधित प्रवाशाला Trip मधून वगळण्याचा अधिकार राहील. अशा निर्णयावर कोणताही Refund देण्यात येणार नाही.
- Photography & Media: Trip दरम्यान Safar Sakhi Tours द्वारे काढलेले फोटो व व्हिडिओ Website, Social Media किंवा Promotional Material मध्ये वापरले जाऊ शकतात. Booking करताना प्रवासी या अटीस सहमती दर्शवितात.
-
Force Majeure Policy: काही परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर असतात. उदाहरणार्थ: अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, रस्ते बंद असणे, वाहतूक कोंडी, सरकारी निर्बंध, नैसर्गिक आपत्ती, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
जर एखाद्या प्रवाशाला याबाबत हरकत असेल, तर कृपया Trip सुरू होण्यापूर्वी WhatsApp वर आम्हाला कळवावे.
तुमची माहिती खाली भरा